Wednesday, September 22, 2010

कातरवेळ आणि आठवणी

कातरवेळ आणि आठवणी

एक शांत समुद्रकिनारा
अगदी एकाकी
एका कोपर्यात पडलेला तो ओंडका
त्यावर एकटीच बसलेली मी
सोबत फक्त तुझ्या आठवणी...

अशाच एका संध्याकाळी
कसल्या तरी विचारात हरवलेली
वाळूवर तुझ नाव कोरत बसलेली ...
इतक्यात एक लाट येते
आणि ते नाव पुसून जात...
तेव्हा वाटत
मनावर कोरलेल नावही अस सहज पुसून टाकता आल तर...
पण तसे होणे नसते

पुन्हा आठवणी जाग्या होतात
पुन्हा डोळे भरून येतात
हळूहळू सूर्य अस्ताला जात असतो
मनातही अंधार दाटून आलेला असतो...
समुद्रावरच्या खार्या वार्यांचा जोर काहीसा कमी झालेला असतो
गालावर ओघळलेली आसव जाणीव करून देतात
चला अंधार पडला घरी परतायची वेळ झाली..
अजून एक कातरवेळ अशीच सरून गेली...अशीच सरून गेली 

No comments:

Post a Comment