Saturday, February 4, 2012

एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ....!!!

काट्या वरुन चालताना एकदा हसुन बघ,
आपल्या विरहातिल गेलेले क्षण एकदा मोजुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

गळुन पडलेल्या झाडाच्या एका-एका पाना कडे बघ,
जीव लावून जगवलेल्या झाडाला एकदा मरताना बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

जीवनात मिळालेल्या सुख-दुःखाची बेरीज करुन बघ,
बाकी काहीच उरले नाहि याचा अंदाज घेवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

मुसळधार पावसात विस्कटलेल्या घराकडे बघ,
माझ्या जीवनरुपी आकशात दुःखाच्या विजेचा तांडव एकदा बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

स्वतःच्या जिवंतपणी मॄत्युला डोळ्या समोर बघ,
तो हि लवकर येत नाहि म्हणुन खंत करणाऱ्या माझ्या मनाकडे बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

खरंच तुझ्या प्रेम भंगाने मी किती तुटुन पडले आहे हे समजण्या साठि...
एकदा माझ्यावर मनापासुन खरे प्रेम करुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

प्रेम भंगाने मला लागलेल्या झळा एकदा तु पण अनुभवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ.....!!!

"तिला पहिले ना कधी...?

(संक्षेप :प्रत्येक तरुणाची स्वप्नातली एक परी असते...! जगाच्या अपरोक्ष ती त्याला रोज दिसते,बोलते,भेटते.... पण......फक्त रात्री ....!! सकाळ होताच ती निघून जाते.... आळवावरल्या जलबिंदुसारखी....! एक स्वप्न असो वा भास.... पण त्यात ती त्याच्याजवळ असते....! केवळ त्याची असते...! त्या रात्रीपासून पहाटेपर्यंतच्या छोट्याशा प्रवासात, त्याच्या मनाला ती कशी भासते...? याचा ठाव घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न....!)
 "तिला पहिले ना कधी...?"
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे,
तरी उमटले मनी... तिचे खोडकर ठसे...! ॥२॥
मन सैरभैर होई... घेऊ पाही रे कानोसे,
ठशाठशातून रुळे... तिच्या प्रेमाचे बाळसे...!
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे ॥ 


डोळे बोलकेसे तिचे... गूढ गुज सांगतसे,
रोखू पाहता डोळ्यांत... माझी नीज् पेंगतसे...!
देही वणवा सुलगावे... तिचे उष्णसे उसासे,
रानभूल टाकू पाही... कानी गुलाब इवलासे...!
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे ॥ 


असा संभार केसांचा... रात माळलीली भासे,
मुखचंद्र आमावसेत... चांदण्यांचे तेज शोषे...!
खणखण कांकणांची... करी ईशारे जरासे,
पैंजणांची रुणुझुणु... देई स्वरांना दिलासे...!
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे ॥ 


कुशीमध्ये विसावया... मी अधिक अभिलासे,
सात जनमांचे देतो... प्रिये तुला भरवसे...!
प्रहर सरता पहाटे... घेत जाई निरोपसे,
सोडू वाटे ना पदर... जिवा लागलेसे पिसे...!
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे ॥ 


दूर गेले धुक्यासवे... तिचे आळोसे-पिळोसे,
ओठी शर्कराचवाने... जणू पेरलेसे हसे...!
खंत वाटे ह्रिदयाला... ती रातीतच दिसे,
मग अखंड दिवस... खंड-खंड छळतसे...!
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे ॥

प्रेम म्हणजे काय मला माहित नाही

प्रेम म्हणजे  काय मला माहित नाही,
पण तुझा वाचून मला आता करमत नाही,

सगळी कडे तूच दिसतेस असे नाही,
प्रत्येक मुलीत तूच दिसतेस असे ही नाही,
पण प्रत्येक क्षणी , प्रत्येक ठिकाणी तू  सोबत नसावी,
याचीच खंत मला वाटावी,
प्रेम म्हणजे  काय मला माहित नाही ,
पण तुझा वाचून मला आता करमत नाही ,

 

तुझा मानत काय आसवे  मला जाणवत नाही,
आणि ते कळावे कि नाही याची मला जाणीव नाही,
अंधारात जगतो आहे तुझाच विचारात,
प्रेमाची एक किरण होऊन येशील का माझा अंधारल्या मनात,
तू येशील कि नाही मला माहित नाही,
पण तुझा वाचून मला आता करमत नाही,

प्रेम  म्हणजे  खरच काय असते,
सगळे करतात मानून करायचे का असते,
माझे मलाच माहित नाही हे प्रेम  खरच काय असते,
समजेल तेवढे ठेवायचे बाकी सोडायचे असते,
समजले तेवढे वळेल असे काही नसते,
मानून मानतो,
प्रेम म्हणजे काय मला माहित नाही,
पण तुझा वाचून मला आता करमत नाही,

वाटते असेच आयुक्ष भर तुझी वाट बघत जगावे,
तुझा मनात एकदा घर करून तरी पाहवे,
पण तुझा होकाराला कि नाकारला कसे सामोरे जावे,
या विचाराने मन माझे थरारून जाते,
तरीही मनात विचार सतत तुझाच असते,
काय करावे, कोणाला सांगावे मला काही काळत नाही,
पण तुझा वाचून मला आता करमत नाही.

कोणी म्हणे प्रेम मंजे मैत्री,
तर कोणी माने प्रेयसी ची गोड आठवण,
कोणी म्हणे प्रेम मंजे फक्त देणे,  नाही मिळवणे,
आणी न मिळवता ते मीळेल याची खात्री असणे,
प्रेम म्हणजे जगायचं एक मजबूत अधर असतो,
माणसाला माणसात आणते ते प्रेम असते,
प्रेमा साठी जगावे तेच प्रेम असते,
खरच कसे हे प्रेम असते मला कधी कळले नाही,
पण तुझा वाचून मला आता करमत नाही.

उगाच हसावे,
उगाच तुझा आठवणीत मन भरून यावे,
एकटय मध्ये तुझा हसरा चेहरा आठवाने,
आणी तो कागदा वर  उत्रवायचा खुळा प्रयत्न करणे,
तुझा नंबर मिळतो का, याचा प्रयत्न करणे,
आणी तो मिळाल्या वर काल करावे कि नाही याचा विचार करणे,
व्यालांतीने डे ला देवदास बनून एकटे बसावे,
खरच असे वेडे का हे प्रेम असते,
प्रेम म्हणजे काय मला खरच माहित नाही,
पण तुझा वाचून मला आता खरच करमत नाही……………