Saturday, February 18, 2012

होता एक वेडा मुलगा तिच्यावर खुप प्रेम करायचा....!

होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा
आठवण तिची आल्यावर
कविता करत बसायचा..


कधी तिच्या केसांत गुंतायचा, 
कधी तिच्या डोळ्यात बुडायचा,
कधी तिच्या ओठांवर अडकायचा,
तर कधी गालवर गोड हसू आणायचा...


नेहमी काहीना काही उपमा द्याचा 
आज परी तर उद्या सरी..........!
प्रेम फक्त तोच करतो
असे काही वागायचा


पेनाची शाई संपली तरी 
शब्द काही संपे ना
त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा
कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र दयाचा


कवीता तिला आवडली 
की वही मागे चेहरा लपवून
खुप गोड हसायची............ !
पण कवीता तिला कधीच समजली नव्हती
कारण प्रेम फक्त तोच करायचा............ .!


आज नाही त्याच्या आयुषात ती 
तरी कवीता करतोय...........!
एक आठवण म्हणुन,
एक समाधान म्हणुन,


होता एक वेडा मुलगा 
तिच्यावर खुप प्रेम करायचा.......

Monday, February 6, 2012

आठवणी

कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !

कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !

परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !

पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.

अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!

पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती !!!!!!

कुठला ही छंद नव्हता मला

कुठला ही छंद नव्हता मला
प्रेमाचा गंध नव्हता मला
आयुष्य जगत होतो मी वेगला 
प्रेमाचा रंगच माहित नव्हता मला

अचानक एक घटना घडली 
एक परी माझ्या जीवनात आली 
ती परी माझ्या मानत भरली 
माझे जीवनच बदलून गेली 

ती समोर येताच मी स्वताला विसरून गेलो 
तिच्या  प्रेमाच्या जाल्यात अडकत गेलो 
काहीही न करता फ़क्त तिलाच पाहत राहिलो 
तिला पाहत पाहत जीवन जगत राहिलो 

हे कस झाल समजल नाही मला  
नाद कसा लागला तिचा हे उमजलच नाही मला 
नाद कसा लागला तिचा हे उमजलच नाही मला....

Sunday, February 5, 2012

नेहमीच्या वाटेवरून जाताना अवचित तू भेटशील


  • नेहमीच्या वाटेवरून जाताना अवचित तू भेटशील 
    "कसा आहेस रे तू ...?"असे हळूच विचारशील
    पाणावलेल्या डोळ्यांनी मी किंचित हसेल अन सांगेल "मी ठीक आहे..आणि तू ..?"
    तुझ्याही गालावरून मग पाणी ओघळेल "मी पण ..." असे बोलून तू ते टिपून घेशील....
    'आठवतंय का तुला ...' असं बोलून मग गप्पांना सुरुवात होईल
    ... ... जुने क्षण पुन्हा नव्याने तू उलगडशील...
    नेहमीसारखी तू अखंड बडबड करणार नाहीस
    अन मी हि नेहमीसारखा तुला गप्प बसवणार नाही
    कारण तो प्रत्येक क्षण मला साठवून ठेवायचा असेल
    कारण पुन्हा ऐकायला कदाचित मी हि नसेन ........
    एखादा क्षण मनसोक्त हसवेल तर एखादा डोळेभरून रडवेन
    "काही नाही ग हसून हसून डोळ्यात पाणी आलं" असं म्हणून मी गप्प बसेन.....
    थोडा वेळ गप्प राहुन 'मग ...अजून काय ..?" असं विचारशील
    मी काही बोलायच्या आतच "आता निघायला हवं" असं म्हणून तू जायला निघशील...
    तुझ्या पावलांचं ते जाताना घुटमळणं मला टोचून जाईन
    'पुन्हा कधी ..." वाक्य अर्धवटच राहून जाईन.........
    सगळं काही असेल आपल्याकडे
    पण आपण एकमेकांचे नसू ........
    असतील फक्त तुझे नि माझे जपलेले ते आसू ....

Saturday, February 4, 2012

एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ....!!!

काट्या वरुन चालताना एकदा हसुन बघ,
आपल्या विरहातिल गेलेले क्षण एकदा मोजुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

गळुन पडलेल्या झाडाच्या एका-एका पाना कडे बघ,
जीव लावून जगवलेल्या झाडाला एकदा मरताना बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

जीवनात मिळालेल्या सुख-दुःखाची बेरीज करुन बघ,
बाकी काहीच उरले नाहि याचा अंदाज घेवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

मुसळधार पावसात विस्कटलेल्या घराकडे बघ,
माझ्या जीवनरुपी आकशात दुःखाच्या विजेचा तांडव एकदा बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

स्वतःच्या जिवंतपणी मॄत्युला डोळ्या समोर बघ,
तो हि लवकर येत नाहि म्हणुन खंत करणाऱ्या माझ्या मनाकडे बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

खरंच तुझ्या प्रेम भंगाने मी किती तुटुन पडले आहे हे समजण्या साठि...
एकदा माझ्यावर मनापासुन खरे प्रेम करुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

प्रेम भंगाने मला लागलेल्या झळा एकदा तु पण अनुभवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ.....!!!

"तिला पहिले ना कधी...?

(संक्षेप :प्रत्येक तरुणाची स्वप्नातली एक परी असते...! जगाच्या अपरोक्ष ती त्याला रोज दिसते,बोलते,भेटते.... पण......फक्त रात्री ....!! सकाळ होताच ती निघून जाते.... आळवावरल्या जलबिंदुसारखी....! एक स्वप्न असो वा भास.... पण त्यात ती त्याच्याजवळ असते....! केवळ त्याची असते...! त्या रात्रीपासून पहाटेपर्यंतच्या छोट्याशा प्रवासात, त्याच्या मनाला ती कशी भासते...? याचा ठाव घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न....!)
 "तिला पहिले ना कधी...?"
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे,
तरी उमटले मनी... तिचे खोडकर ठसे...! ॥२॥
मन सैरभैर होई... घेऊ पाही रे कानोसे,
ठशाठशातून रुळे... तिच्या प्रेमाचे बाळसे...!
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे ॥ 


डोळे बोलकेसे तिचे... गूढ गुज सांगतसे,
रोखू पाहता डोळ्यांत... माझी नीज् पेंगतसे...!
देही वणवा सुलगावे... तिचे उष्णसे उसासे,
रानभूल टाकू पाही... कानी गुलाब इवलासे...!
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे ॥ 


असा संभार केसांचा... रात माळलीली भासे,
मुखचंद्र आमावसेत... चांदण्यांचे तेज शोषे...!
खणखण कांकणांची... करी ईशारे जरासे,
पैंजणांची रुणुझुणु... देई स्वरांना दिलासे...!
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे ॥ 


कुशीमध्ये विसावया... मी अधिक अभिलासे,
सात जनमांचे देतो... प्रिये तुला भरवसे...!
प्रहर सरता पहाटे... घेत जाई निरोपसे,
सोडू वाटे ना पदर... जिवा लागलेसे पिसे...!
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे ॥ 


दूर गेले धुक्यासवे... तिचे आळोसे-पिळोसे,
ओठी शर्कराचवाने... जणू पेरलेसे हसे...!
खंत वाटे ह्रिदयाला... ती रातीतच दिसे,
मग अखंड दिवस... खंड-खंड छळतसे...!
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे ॥

प्रेम म्हणजे काय मला माहित नाही

प्रेम म्हणजे  काय मला माहित नाही,
पण तुझा वाचून मला आता करमत नाही,

सगळी कडे तूच दिसतेस असे नाही,
प्रत्येक मुलीत तूच दिसतेस असे ही नाही,
पण प्रत्येक क्षणी , प्रत्येक ठिकाणी तू  सोबत नसावी,
याचीच खंत मला वाटावी,
प्रेम म्हणजे  काय मला माहित नाही ,
पण तुझा वाचून मला आता करमत नाही ,

 

तुझा मानत काय आसवे  मला जाणवत नाही,
आणि ते कळावे कि नाही याची मला जाणीव नाही,
अंधारात जगतो आहे तुझाच विचारात,
प्रेमाची एक किरण होऊन येशील का माझा अंधारल्या मनात,
तू येशील कि नाही मला माहित नाही,
पण तुझा वाचून मला आता करमत नाही,

प्रेम  म्हणजे  खरच काय असते,
सगळे करतात मानून करायचे का असते,
माझे मलाच माहित नाही हे प्रेम  खरच काय असते,
समजेल तेवढे ठेवायचे बाकी सोडायचे असते,
समजले तेवढे वळेल असे काही नसते,
मानून मानतो,
प्रेम म्हणजे काय मला माहित नाही,
पण तुझा वाचून मला आता करमत नाही,

वाटते असेच आयुक्ष भर तुझी वाट बघत जगावे,
तुझा मनात एकदा घर करून तरी पाहवे,
पण तुझा होकाराला कि नाकारला कसे सामोरे जावे,
या विचाराने मन माझे थरारून जाते,
तरीही मनात विचार सतत तुझाच असते,
काय करावे, कोणाला सांगावे मला काही काळत नाही,
पण तुझा वाचून मला आता करमत नाही.

कोणी म्हणे प्रेम मंजे मैत्री,
तर कोणी माने प्रेयसी ची गोड आठवण,
कोणी म्हणे प्रेम मंजे फक्त देणे,  नाही मिळवणे,
आणी न मिळवता ते मीळेल याची खात्री असणे,
प्रेम म्हणजे जगायचं एक मजबूत अधर असतो,
माणसाला माणसात आणते ते प्रेम असते,
प्रेमा साठी जगावे तेच प्रेम असते,
खरच कसे हे प्रेम असते मला कधी कळले नाही,
पण तुझा वाचून मला आता करमत नाही.

उगाच हसावे,
उगाच तुझा आठवणीत मन भरून यावे,
एकटय मध्ये तुझा हसरा चेहरा आठवाने,
आणी तो कागदा वर  उत्रवायचा खुळा प्रयत्न करणे,
तुझा नंबर मिळतो का, याचा प्रयत्न करणे,
आणी तो मिळाल्या वर काल करावे कि नाही याचा विचार करणे,
व्यालांतीने डे ला देवदास बनून एकटे बसावे,
खरच असे वेडे का हे प्रेम असते,
प्रेम म्हणजे काय मला खरच माहित नाही,
पण तुझा वाचून मला आता खरच करमत नाही……………